जो स्वत:त बदल घडवून आणण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे;अशा प्रत्येकासाठी...


Wednesday, 13 March 2019

अभिज्ञान अकादमी

मानवी जीवनावर बुद्धी आणि मन यांचा परिणाम कसा होतो ?
विचार, भावना व वर्तनातून साकारणारा स्वभाव हा
प्रत्येक कृतीमागे कसा निगडित आहे ?
आयुष्य सुखी आणि यशस्वी करणाऱ्या अंत:स्थ शक्ती कोणत्या ?
शिक्षण आणि जगणं यांचं नेमकं नातं काय ?
याविषयी मूलभूत मांडणी करणाऱ्या आमच्या कार्यशाळेमध्ये
कोणत्याही तांत्रिक कौशल्यावर भर न देता मनस्वी प्रयोगांतून
क्षमता उणिवा प्रवृत्ती सामर्थ्याची जाणीव होऊन
उच्चार विचार आचारांना आत्मभान लाभतं.

प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत:च असतो आणि
जिवलग मित्रही तोच असतो ;
हा दृष्टिकोन इथं आंतरबाह्य बदलत असतो.

अकादमी गेल्या २० वर्षांपासून अभ्यासाला आणि आयुष्याला
विधायक दृष्टिकोन आणि आत्मभान देण्यासाठी
विविध शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करीत आहे.
कोणतीही जाहिरात न करता अकादमीच्या कार्यशाळांमध्ये
आजवर सुमारे ५०,००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून
त्यांना स्वत:ची नव्यानं ओळख झालेली आहे.

जे स्वत: बदल करण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहेत; अशा प्रत्येकासाठी...

|| अभिज्ञान अकादमी ||

Saturday, 9 March 2019

जीवनाला नवं वळण लावणारी स्वयंअध्ययन कार्यशाळा

जन्माला येणारा प्रत्येक जण आपापल्या प्रकारे, विविध अनुभवांतून शिकतच असतो.
जीवनातील विविध अनुभव घेत असतो. मात्र हे जीवन जगताना आपल्या जीवनाला नवं वळण
मिळालं तर... योग्य वेळी योग्य वळण, योग्य विचार, आचार मिळाले तर... तर जीवनाला,
जीवन जगण्याला वेगळा आयाम मिळू शकतो. मग विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेतच हे सर्व मिळालं तर तो यो जगात आपल्या मनासारखं जगू शकतो.

आपली स्वप्नं साकार करू शकतो. आपल्या कल्पनाशक्तींना वाव देऊ शकतो.
या सर्वांचा विचार करून प्रा. विजय जामसंडेकर सरांनी स्वयंअध्ययन कार्यशाळा सुरू केली.
आज या कार्यशाळेतून हजारो विद्यार्थी जीवनातील अमूल्य असं शिक्षण घेऊन, मार्गदर्शन घेऊन
यशस्वी जीवन जगत आहेत. त्यामागे 'अभिज्ञान अकादमी'च्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या
कार्यशाळेचा मोठा वाठा आहे. प्रा. विजय जामसंडेकर सरांची मार्गदर्शन करण्याची पद्धत,
विद्यार्थ्यांना व्यक्त करायला लावण्याची पद्धत ही वाखाणण्यासारखी.

या कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षेची, अभ्यासाची भीती दूर पळाली.
नेहमीच अवघड वाटणाऱ्या अभ्यासाची गोडी वाटू लागली. मनातील भीती दूर गेल्यामुळे
बोलायला लाजणारी मुलं चक्क स्टेजवर जाऊन परफॉर्म करू लागली.
आपल्या पाल्यात झालेला बदल पाहून पालकही चक्रावून जातात.

मनात साचलेलं सगळं सांगताना मुलं अगदी ढसाढसा रडतात. आपलं काय चुकलं हे
पालकांनाही कळलं. अशी किमया अकादमीच्या कार्यशाळांमध्ये घडते.
आजची परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, स्मरणशक्ती, एकाग्रता, घरचं आणि शाळेचं वातावरण
यांचा मुलांच्या आयुष्यावर, अभ्यासावर कसा परिणाम होतो, मुलांचा नेमका स्वभाव
कसा असतो? याचं शास्त्रीय दृष्टिकोनातून या कार्यशाळेत विश्लेषण केलं जातं.
अभ्यासाचं तंत्र, हस्ताक्षराचं महत्त्व, व्यक्तिमत्त्व आणि अंतर्मनाचं महत्त्व या सर्व गोष्टींना
जीवनात महत्त्वाचं स्थान आहे आणि हे आत्मसात करायचं असेल तर जीवनाला वळण
देणारी कार्यशाळा एकदी तरी अनुभवायला हवी; एवढं निश्चित...

- अभिज्ञान अकादमी परिवार
    (साभार अहमदनगर पुरवणी )  

एकमेवाद्वितीय

घराघरांतून आयुष्याच्या परीक्षेत नापास होणारं;
मूल अपयशाच्या भीतीनं गुदमरतं आहे...
त्याला हवं आहे त्याच्या मनासारखं शिक्षण
त्याला हवा आहे त्याच्या आवडीचा अभ्यास
त्याला हवी आहे त्याच्या गुणवत्तेची परीक्षा
त्याला हवी आहे त्याच्या स्वत:ची ओळख

कारण प्रत्येक मूल या जगातील एकमेवाद्वितीय आहे
ते एक स्वयंभू, स्वतंत्र आणि स्वयंप्रज्ञ म्हणून जन्माला आलं आहे
त्याची स्वत:ची एक विचाराधारा आहे
त्याचं स्वत:चं जगावेगळं अवकाश आहे...

त्याला जन्मसिद्ध सामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या
नव्या शिक्षणप्रणालाची आज नितांत गरज आहे...

- प्रा. विजय जामसंडेकर

प्राथमिक शिक्षण

मूल हे आपलं भविष्य असतं; असं म्हटलं जातं, परंतु हे भविष्य समाजमनाचं केंद्र
कधीही बनलं नाही. प्रौढ व्यक्तीच समाजाच्या केंद्रस्थानी असतात म्हणून
समाजाची ज्या विचारांच्या बळावर मानसिकता तयार होते. त्या प्राथमिक शिक्षणाच्या
स्तराविषयी अधिक जागरुक राहणं गरजेचं आहे.

- प्रा. विजय जामसंडेकर

सुजाण पालकत्व

मूल जन्माला आलं की व्यक्तीची पालक म्हणून ओळख होतेच, परंतु
आपल्या अंशातून निर्माण झालेल्या वारसाला व्यवस्थेचा बळी ठरू न देण्यासाठी
सुजाण पालकत्व ही आजच्या काळाची नितांत गरज आहे.

- प्रा. विजय जामसंडेकर

जोपासना पर्व

घर, परिसर आणि शाळा... मिळून समाज सारे आपण
शिकवता येतं नव्या जीवाला; अशीच आपली शिकवण

'मातीचा गोळा' किंवा 'कोरी पाटी' समजून उदाहरण
घडवता येतं नवागताला; असंच आखतो धोरण

खरंच कां असं घोकून, आखून शिकवता... घडवता येतं?
खरं तर मूलच आपल्याकडून शिकत... घडत असतं

ते असतं स्वयंप्रज्ञ; मूलत: निराळं, एकमेव जगावेगळं
ते आपलं असलं तरी, त्याचं असतं आभाळ आगळं

ते असतं या सृष्टीतील एक नवनिर्मिक, अज्ञाताचा उद् गार
तेच नवा इतिहास घडवतं; फक्त हवा जोपासना संस्कार

त्याच्या विचारांतूनच घडतं व्यक्तिमत्त्व आणि स्वप्न मनासारखं
त्याला फक्त हवं असतं... प्रेम, विश्वास आणि घर घरासारखं

आपण असतो केवळ जन्म-मार्गदाता, नसतो भाग्यविधाता
तेच असतं स्वत:च्या आयुष्याचा... भविष्याचा कर्ता-करविता

- प्रा. विजय जामसंडेकर

स्वप्न आणि दृष्टिकोन


स्वप्न आणि रूप वेगळं नसतं

स्वप्न आणि प्रतिबिंब वेगळं नसतं

स्वप्न आणि जगणं वेगळं नसतं

स्वप्न आणि करिअर वेगळं नसतं





स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी
प्रत्येकाच्या वेगळ्या स्वप्नासाठी...
                                            
- प्रा. विजय जामंडेकर

विचार


विचार व्यक्तित्वाला चेहरा देत असतात.
विचार जगण्याला अर्थ देत असतात.
विचार स्वप्नाला मूर्त रूप देत असतात.
म्हणूनच, विचारांचं सामर्थ्य कळलेली माणसं;
जगावर सत्ता गाजवत असतात.

- प्रा. विजय जामसंडेकर

Sunday, 3 March 2019

शब्द




शब्द यश देतात...
शब्द ओळख देतात...
शब्द नाव देतात...
शब्द नातं देतात...


शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही
मनामनांत जपणारी जगावेगळी ओळख देतात.
शब्दांचं मोल जपलं की, आपलंही
आयुष्य लाखमोलाचं होतं.


                                                      - प्रा. विजय जामसंडेकर