जो स्वत:त बदल घडवून आणण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे;अशा प्रत्येकासाठी...


Thursday, 11 March 2021

गुण, गाईन 'आवडी'

ज्याची सर्वाधिक 'आवड' आहे;

त्याची मनापासून 'निवड' करणं

हेच यशस्वी होण्याचं सूत्र आहे.

जे मनस्वी आवडतं, ते सोपं वाटतं

आणि जे सोपं वाटतं, ते अधिक

सुंदर करणं, सहज शक्य असतं.


प्रत्येक व्यक्तीची आवडी ही

विचार, दृष्टिकोन, स्वभाव,

संस्कार आणि सप्तगुणांतून...

निर्माण होत असते.

आवड आंतरिक उर्मी असते;

उमेद देणारी ऊर्जा असते, ती

छंदातून अभिव्यक्त होत असते.

ती जगण्याची सवय असते.

स्वाभाविक ओढ अर्थात;

Passion असते.

स्वप्नाचं बीजरूप असते.

जे आवडतं ते अशक्य असो वा

प्रतिकूल त्यावर मात करता येते.

त्याकरीता... आपली आवड

नेमकेपणानं वेळीच

ओळखता यायला हवी.

स्वत:ला नेमंक काय जमतं...

मन कशात आतून रमतं...

हे एकदा कळलं आणि स्वीकारलं की,

जगणं एक स्वप्न बनतं.


आपल्याला अनेक गोष्टींची 

मनस्वी 'आवड' असतेच पण

त्यातही आतून ओढ असलेलं,

अस्वस्थ करणारं, वेगळं भावणारं

ओळख, आनंद आणि मनासारखं

अपेक्षित यश देणारं

आपलं एक स्वप्नातलं गाव असतं...

- प्रा. विजय जामसंडेकर सर (संस्थापक अभिज्ञान अकादमी)

No comments:

Post a Comment