जो स्वत:त बदल घडवून आणण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे;अशा प्रत्येकासाठी...


Sunday, 19 January 2020

विजयपर्व... एक अभियान - १८ जानेवारी २०२०

विजयपर्व एक अभियान... उपक्रमांतर्गत 
शिक्षण संवाद - विचार मंच द्वारा
भावनिक साक्षरता काळाची गरज !

अभिज्ञान परिवार १८ जानेवारी २०१७ पासून अभिज्ञान अकादमी  संस्थेचे संस्थापक, ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि समुपदेशक प्रा.विजय जामसंडेकर सरांच्या जन्मदिवसानिमित्त विजयपर्व एक अभियान... उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. 
यावर्षी सदर उपक्रमांंतर्गत 'भावनिक साक्षरता काळाची' गरज या विषयावर भावनिक बुद्धिमत्ता विशेषज्ञ डॉ. संदीप केळकर सर आणि ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर मॅडम या अभ्यासू व्यक्तिमत्त्वांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम कुर्ला नेहरूनगर येथील श्रीमान बाळासाहेब ठाकरे समाजकेंद्र येथे शनिवार, दि. १८ जानेवारी २०२० रोजी पार पडला.


स्थानिक आमदार श्री. मंगेश कुडाळकर यांचे मानचिन्ह देऊन स्वागत करताना अभिज्ञान अकादमीचे अध्यक्ष श्री. विजय तांडेल.

डॉ. संदीप केळकर सरांचे स्वागत करताना.

डॉ. शुभांंगी पारकर मॅडमचे स्वागत करताना.


कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना नगरसेविका सौ. सान्वी विजय तांडेल.



भावनिक साक्षरता काळाची गरज या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित असलेला पालकवर्ग व मान्यवर.